महाराष्ट्र राज्याची प्रमुख वैशिष्ठ्ये:
- महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या प्रमुख खडकापासून बनलेली आहे
- कोकणात जाम्भा चीरा अढाळतो
- राज्यातील कळसूबाई हे सर्वोच्च शिखर उंची - १,६४६ मी
- दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते; तिला रेगुर म्हणतात
- माथेरान, महाबलेश्वर यासारखी थंड हवेची ठिकाणे
- अंबोली, सिंधुदुर्ग येथे राज्यातील सर्वाधिक पाउस
- बुलढाना जिल्ह्यातील 'लोणार' हे उल्कपातामुले निर्माण झालेले खारट पाण्याचे सरोवर
- तापी, गोदावरी, वैनगंगा, वर्धा, भीमा, कृष्णा या प्रमुख नद्यांनी राज्याला सुफलाम सुजलाम केले आहे
- पूर्व विदर्भ साग, बांबू यांच्या वनासठी तसेच कोळसा, लोह व मंगनीज या खानिजानी समृद्ध आहे
- शेती हा राज्यातील प्रमुख व्यवसाय
- ज्वारी, बाजारी, तांदुळ, गहू ही प्रमुख पीके
- ऊस, कापूस, तंबाखू, गलीत धान्ये ही नगदी पीके
- कापड गिरण्या व साखर कारखान्याची रेलचेल
- फळ लगावडित महाराष्ट्र देशात अग्रेसर
- नागपुरची संत्री, जळगावची केळी, नाशिक - संगलीची द्राक्षे, रत्नागिरिचा हापूस प्रसिद्ध आहे
- मुंबई हे देशातील प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर आहे
- मुंबई - महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी व देशाची आर्थिक राजधानी
- नागपुर - ही महाराष्ट्राची उपराजधानी, आंबेडकर यांनी बौद्ध धर्म याच नागभुमितच स्वीकारला
- कोयना विजकेंद्र, जायकवाडी धरण, तारापुर अणुवीज केंद्र, अरबी समुद्रातील बॉम्बे हाय तेलक्षेत्र
- इतर अनेक उद्योगानी राज्याच्या वैभवात भर टाकली आहे
- एतिहासिक साक्ष देणारे मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी, रायगड किल्ले
- समर्थ रामदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड आदि प्रेक्षणीय किल्ले
- शिरवाडकर, खांडेकर, पु ल देशपांडे यानि मराठी राजभाषा समृद्ध केलेली आहे
- शाहू, फुले, आंबेडकर यानि समाजसुधारनेची बीजे मराठी मातीत रुजविली
No comments:
Post a Comment