Monday 20 June 2016

चालू घडामोडी : १७ जून

१. जागतिक रक्तदान दिननिम्मित कोणती थीम ठेवण्यात आली होती?
उत्तर - ब्लड कनेक्टस अस आल, जागतिक रक्तदान दिन हा दरवर्षी १४ जून रोजी साजरा केला जातो. अधिकाधिक लोकांनी रक्तदान करावे त्याचप्रमाणे रक्ताची क्वॉलिटी, प्रमाण हयाबाबत जागरूकता लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी हा दिवस जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २००४ पासून पाळला जातो. जग भरातून जास्तीतजास्त लोकांनी रक्तदान करावे ह्यासाठी २०१६ ची थीम होती 'ब्लड कनेक्टस अस आल'.
२. सेंट पिटरस्बर्ग येथे पार पडलेल्या अंतरराष्ट्रीय आर्थिक मंचच्या बैठकीमध्ये भारताकडून कोणी प्रतिनिधित्त्व केले?
उत्तर - धर्मेंद्र प्रधान, रशियाच्या सेंट पिटरस्बर्ग पार पडलेल्या बैठकीमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरममध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व केले. ही बैठक १६-१७ जूनला पार पडली. सेंट पिटरगबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम ही दरवर्षी होणारी अंतरराष्ट्रीय परिषद असून आर्थिक आणि बिज़नेस समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भरविण्यात येते.
३. भारतीय रिजर्व बँकेच्या गवर्नरपदाच्या उमेदवार नेमनुकीसाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे?
उत्तर - पी के सिन्हा समिती, भारतीय रिज़र्व बँकेचे सध्याचे गवर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ संपणार असून त्याच्या ठिकाणी योग्य उमेदवार नेमन्यासाठी केंद्र सरकारने कैबिनेट सचिव पी के सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
४. संयुक्त राष्ट्रांच्या ७१ व्या महसभेसाठी कोणाची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे?
उत्तर - पीटर थॉमसन, फिजीचे संयुक्त राष्ट्राचे दूत पीटर थॉमसन यांची संयुक्त राष्ट्राच्या ७१ व्या महासभेसाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ते सध्याचे महासभेचे अध्यक्ष मोगेंस लयकेटोफ्ट यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतील. पीटर यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ पासून सुरु होणार आहे.
५. 'डेल्टा ४ हेवी' हे जगातील सर्वात ताकदवान रॉकेट कोणत्या देशाने बनविले आहे?
उत्तर - अमेरिका, नुकतेच अमेरिकेने गुप्तहेरसाठी 'एनआरओएल-३७' उपग्रह डेल्टा हेवी रोकेटच्या मदतीने अवकाशामध्ये प्रक्षेपित केला. डेल्टा ४ हेवी रॉकेट जगातील सर्वात पावरफुल रॉकेट असून एनआरओने हे रॉकेट डिजाइन, तयार आणि ऑपरेट देखील करते.
६. २०१६ ची फार्मूला वन कैनेडियन ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली आहे?
उत्तर - लेविस हैमिलटन, ब्रिटिश फार्मूला वन रेसिंग चालक लेविस हैमिलटनने मोंटेरल येथे झालेली २०१६ ची फॉर्मूला वन कैनेडियन ग्रँड प्रिक्स जिंकली आहे. तो मर्सेडीज़ एएमजी पेट्रोन्स टीमचा सदस्य आहे.

No comments:

Post a Comment