Tuesday 21 June 2016

हॉकी चॅम्पियन ट्रॉफी २०१६ ऑस्ट्रेलियाने जिंकली

यूनाइटेड किंगडम मधील लंडन येथे झालेल्या अंतिम सामान्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला ३-१ असे नमवून चैम्पियन्स ट्रॉफी हॉकी २०१६ वर आपले नाव कोरले. यासोबतच आजवर ऑस्ट्रेलियाने ही स्पर्धा १४ वेळा जिंकून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. लंडनमध्ये झालेल्या अंतिम सामान्यामध्ये दोन्ही संघ दोन्ही हाफमध्ये एकही गोल करु शकले नाहीत. पेनाल्टी शूटआउट मध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ३-१ अशी मात केली.
ऑस्ट्रेलियासाठी पेनाल्टी शूटआउट मध्ये एरान जलेव्स्की, डेनियल बैले आणि साइमन ऑर्चर्ड ह्यांनी प्रत्येकी एक-एक गोल केले तर हरमनप्रीत सिंह ह्याने भारताकडून एक गोल केला. ह्या पराभवासोबतच भारताला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.
चैम्पियन्स ट्रॉफी हॉकीबाबत थोडक्यात माहिती:
* चैम्पियन्स ट्रॉफी ही अंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन मार्फ़त भरविण्यात येते.
* प्रथम ही स्पर्धा १९७८ साली पाकिस्तानचे एयर मार्शल नूर खान आणि पाकिस्तान हॉकी फेडरेशनच्या सहयोगाने भरविण्यात आली होती.
* सुरुवातीला ही स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येत होती परंतु हॉकी वर्ल्ड लीगमुळे २०१४ पासून ही स्पर्धा दोन वर्षांनंतर भरविण्यात येत आहे.
* ह्या स्पर्धेमध्ये क्रमवारीत अग्रेसर असलेल्या देशांचेच हॉकी संघ सहभागी होऊ शकतात.
* पुरुषांच्या विभागामध्ये ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा १४ वेळा जिंकला असून, जर्मनी १० तर नेदरलॅंड ८ वेळा जिंकला आहे.
* भारत ही स्पर्धा एकदाही जिंकला नाही तर भारत प्रथमच २०१६ मध्ये अंतिम सामान्यामध्ये खेळला आहे.

No comments:

Post a Comment