Sunday 5 June 2016

चालू घडामोडी : ३ जून

१. नुकतेच सलमा धरणाच्या उद्घटनासाठी नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने निमंत्रित केले होते?
अ - ईरान
ब - अफ़ग़ानिस्तान
क - कटार
ड - मालदीव

२. भारतीय रिज़र्व बँकेने बँक व्याजदरात कितीने कपात केली आहे?
अ - ०.१०%
ब - ०.१५%
क - ०.२०%
ड - ०.२५%

३. जागतिक मिल्क डे (दूध दिन) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
अ - १ जून
ब - २ जून
क - ५ जून
ड - ९ जून

४. सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांच्या पायाभरणीसाठी राष्ट्रीय धोरण मसुदा (ड्राफ्ट नॅशनल पॉलिसी) तयार करण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली आहे?
अ - प्रभात कुमार कमिटी
ब - शांता कुमार कमिटी
क - नीरज कुमार गुप्ता कमिटी
ड - कमल पांडे कमिटी

५. भारतीय क्रिकेट बोर्डचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
अ - महंत शर्मा
ब - अनुराग ठाकुर
क - अजय शिर्के
ड - राहुल जोहरी

६.सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी किमान रक्कम ..... आहे?
अ - १०० रुपये
ब - ५०० रुपये
क - १००० रुपये
ड - ५००० रुपये

उत्तरे -
१ (ब) अफ़ग़ानिस्तान, सलमा धरण अफ़ग़ानिस्तानमध्ये असून, अफगानिस्तानने हे धरण भारताच्या मदतीने बांधले आहे.
२ (ड) ०.२५%
३. (अ) १ जून, दूध हे जागतिक दर्जाचे अन्न म्हणून ओळखले जावे यासाठी जागतिक दूध दिन हा दरवर्षी २ जूनला साजरा केला जातो. दुग्ध क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्याचप्रमाणे ते संपूर्ण जगाशी जोडले जावे यासाठी हा दिवस दरवर्षी अन्न आणि कृषी संघटनेमार्फ़त साजरा केला जातो.
४. (अ) प्रभात कुमार कमिटी, भारत सरकारने सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगांच्या पायाभरणीसाठी लगणार्य राष्ट्रीय धोरण मसुदा तयार करण्यासाठी प्रभात कुमार समिती स्थापन केली आहे. ही समिती ४ महिन्यांच्या आतमध्ये आपला अहवाल सादर करेल.
५. (ड) राहुल जोहरी, माजी मिडिया पोफेशनल राहुल जोहरी यांची प्रथमच भारतीय क्रिकेट बोर्डचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष म्हणुन नेमणुक झाली आहे. न्यायाधीश लोढ़ा यांच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
६. (क) १००० रुपये, सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी १००० रुपये लागतात तर एका खात्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये १५०,००० रुपये जमा केले जाऊ शकतात.

No comments:

Post a Comment