Tuesday 14 June 2016

चालू घडामोडी : १२ जून

१. कोणत्या राज्य सरकारने शेती उत्पन्नावरील कर रद्द केला आहे?
अ - कर्नाटक
ब - राजस्थान 
क - बिहार
ड - पंजाब

२. जननी सेवा ही नवीन योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे?
अ - रेल्वे मंत्रालय
ब - महिला आणि बाल विकास मंत्रालय
क - गृह मंत्रालय
ड - कामगार आणि रोजगार मंत्रालय

३. २०१६ ची महिला एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिस ही बॅडमिंटन स्पर्धा कोणी जिंकली आहे?
अ - पी व्ही सिंधू 
ब - यिहान वांग 
क - साइना नेहवाल
ड - सुन यु

४. २०१६ चा अंतरराष्ट्रीय डबलिन साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
अ - अखिल शर्मा 
ब - शंतनु गुहा 
क - निर्मल जैन 
ड - प्रीती कपूर

५. फ़ोर्ब्सने जाहीर केलेल्या १०० सर्वाधिक पेड़ खेळाडूंच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोण आहे?
अ - रॉजर फेडरर 
ब - नोवाक जोकोविच
क - क्रिस्टिआनो रोनाल्डो
ड - लिओनेल मेस्सी

उत्तरे:
१. (अ) कर्नाटक, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरमैाह ह्यांनी नुकतीच शेत मालावरील उत्पन्नावरील कर रद्द केला आहे, २०१६-१७ च्या बजेटमध्ये तो आकारण्यात आला होता.
२. (अ) रेल्वे मंत्रालय, जननी सेवा योजना रेल्वे मंत्रालयाने सुरु केली असून त्या योजनेअंतर्गत रेल्वे स्टेशनवरती गरम दूध, गरम पाणी, लहान बाळाला अन्न उपलब्ध असेल.
३. (क) साइना नेहवाल, भारतीय बॅडमिंटनपटू साइना नेहवालने २०१६ ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिज जिंकली आहे. सिडनी येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये तिने सुन युचा ११-२१, २१-१४, २१-१९ असा पराभव केला.
४. (अ) अखिल शर्मा, भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक अखिल शर्मा यांना प्रतिशिष्ठ २०१६ अंतरराष्ट्रीय डबलिन साहित्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार 'फॅमिली लाइफ' आत्मचरित्राला मिळाला आहे. १००,०००/- यूरोज असे पुरस्काराचे स्वरुप असून जर पुस्तक इंग्लिश मध्ये भाषांतरित केले असेल तर ७५,०००/- यूरोज लेखकाला आणि २५,०००/- यूरोज भाषांतरित करणार्या व्यक्तीला.
५. (क) क्रिस्टिआनो रोनाल्डो, फोर्ब्स २०१६ च्या टॉप पेड़ १०० खेळाडूंच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे पोर्तुगलचा क्रिस्टिआनो रोनाल्डो (८८ दशलक्ष डॉलर्स) त्याखालोखाल आहेत लिओनेल मेस्सी, लेबोर्न जेम्स, रॉजर फेडरर, केविन दुरन्त. ह्या यादीमध्ये २३ देश आणि १० खेळांतील खेळाडूंचा समावेश होता.

No comments:

Post a Comment