Tuesday 28 June 2016

चालू घडामोडी : २० जून

१. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने 'स्वयम' तत्त्वावर ऑनलाइन कोर्स सुरु केला असून त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार (टेक्नोलॉजी पार्टनर) म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - माइक्रोसॉफ्ट, केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने स्वयम तत्त्वावर ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठया माइक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली असून ह्याअंतर्गत तीन करोड विद्यार्थांसाठी तब्बल २००० कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. ह्याकार्यक्रमासाठी यूनिवर्सिटी ग्रांट कमीशननेही नवीन नियम निर्माण केले आहेत. माइक्रोसॉफ्ट आणि आल इंडिया कौंसिल ऑफ़ टेक्निकल एजुकेशन दोघांमध्ये ३८ कोटी रुपयांचा करार झाला आहे. स्वयमचा अर्थ स्टडी वेब ऑफ ऐक्टिव लर्निंग फॉर यंग एस्प्रिंग माइंडस.
२. शांघाई अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २०१६ मध्ये एशिया खंडातील नवीन प्रतिभा अंतर्गत कोणत्या भारतीय चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपट आणि सर्वोत्कृष्ठ पठकथा लेखक पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - तिथी, कन्नड़ भाषेतील चित्रपट तिथीला १९ व्या शांघाई चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ठ चित्रपट आणि सर्वोत्कृष्ठ पठकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला आहे. ह्या फ्लिम फेस्टिवलमध्ये निवडला आणि प्रदर्शित झालेला एकमेव चित्रपट होता. हा चित्रपट राम रेड्डी यांनी दिग्दर्शित केला असून राष्ट्रीय पुरस्कार २०१६ मध्ये कन्नड़ भाषेतील बेस्ट फीचर पुरस्कार मिळाला आहे.
३. 'ऊर्जा' मोबईल ऍप कोणी सुरु केले आहे?
उत्तर - पॉवर फाइनेंस कॉर्पोरेशन, अर्बन ज्योती अभियान मोबईल ऍप पॉवर फाइनेंस कॉर्पोरेशनने सुरु केले आहे.
४. २०१६ च्या टॉप ५०० लिस्ट ऑफ सुपरकम्प्यूटर्स नुसार सध्याचा जगातील सर्वात वेगवान सुपरकंप्यूटर कोणता आहे?
उत्तर - तैहु लाइट, चीनी सुपरकंप्यूटर 'सनवे तैहुलाइट' हा जगातील सर्वात वेगवान सुपरकंप्यूटर असून २०१६ च्या टॉप ५०० लिस्ट ऑफ सुपरकम्प्यूटर्स च्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. सनवे तैहुलाइट हा एक सेकंडमध्ये ९३००० ट्रिलियन गणिते करू शकतो. त्याचप्रमाणे ह्या सुपरकंप्यूटरचा वापर संशोधन, इंजीनियरिंग कामे, हवामान फरक, निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. तैहुलाइट खलोखाल तिंहे-२, आईबीएम चा ब्लूजेन/क्यू सिस्टिम, फुजिस्तुचा के कंप्यूटर असून हे ४७ वे एडिशन आहे.
५. अंतरराष्ट्रीय योग परिषद कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - नवी दिल्ली, भारताचे उप-राष्ट्रपती मो. हमीद अन्सारी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे दोन दिवसीय अंतरराष्ट्रीय योग परिषद ' योगा फॉर बॉडी अण्ड बियॉन्ड'. ह्या परिषदेमध्ये अनेक देशांचे ७० प्रतिनिधी सहभागी झाले होते. ह्या परिषदेमध्ये प्रामुख्याने इराक, अफ़ग़ानिस्तान, अल्जीरिया, मलेशिया, स्पेन, रशिया, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, कुवैत, कोरिया देशाचे प्रतिनिधी अधिक होते.
६. २०१६ शांघाई सहकार्य संघटना (शांघाई कोऑपरेशन आर्गेनाईजेशन) ची बैठक कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - उज़्बेकिस्तान, २०१६ शांघाई सहकार्य संघटनेची बैठक उज़्बेकिस्तानच्या ताशकंत मध्ये पार पडली. शांघाई सहकार्य संघटनेची स्थापना २००१ मध्ये चीन, कझगिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उज़्बेकिस्तानच्या नेत्यांनी मिळून केली. यूरेशिया मधील राजकीय, आर्थिक आणि राजकीय समंस्यांचे निर्मूलन करण्यासाठी ही संघटना निर्माण करण्यात आली आहे. २४ जून २०१६ रोजी भारत आणि पाकिस्तानला औपचारिक रित्या ह्या संघटनेचे सदस्य बनविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment