Sunday 12 June 2016

चालू घडामोडी : १० जून

१. २०१६ महिला जूनियर वर्ल्ड चैंपियनशिप कोणत्या देशामध्ये भरविल्या जाणार आहेत?
अ - भारत
ब - चिली
क - बेल्जियम
ड - इंग्लंड

२. जागतिक शांतता निर्देशांक (वर्ल्ड पीस इंडेक्स) २०१६ च्या आकडेवारी मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
अ - १५५ व्या
बी - १४१ व्या
क - १६२ व्या
ड - ११९ व्या

३. नुकतीच पार पडलेली अंतरराष्ट्रीय कामगार परिषद (इंटरनॅशनल लेबर कॉन्फरेंस) कोणत्या शहरामध्ये भरविण्यात आली होती?
अ - नवी दिल्ली
ब - बर्लिन
क - जिनेवा
ड - न्यू यॉर्क

४. 'सहयोग-हएोबलोद-२०१६' हे संयुक्त सैनिकी अभ्यास शिबिर भारत आणि कोणत्या देशा दरम्यान पार पडले?
अ - सिंगापूर
ब - दक्षिण कोरिया
क - वियतनाम
ड - मलेशिया

५. कोणत्या भारतीयाला अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे?
अ - मिल्खा सिंह
ब - पी टी उषा
क - एन रामचंद्रन
ड - अरुणिमा सिन्हा

६. नुकत्याच प्रकाशित झालेल्या सर्वेक्षणानुसार जगामध्ये सर्वात जास्त तेल वापरणारा (ऑइल) देश कोणता आहे?
अ - चीन
ब - भारत
क - अमेरिका
ड - रशिया

उत्तरे:
१. (ब) चिली, २०१६ ची महिला जूनियर वर्ल्ड चैंपियनशिप चिलीच्या सैंटीगो शहरामध्ये २४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान पार पडणार असून भारत ह्या स्पर्धेमध्ये सभासद नाही.
२. (ब) १४१ व्या, जागतिक शांतता निर्देशांक २०१६ नुसार भारत १६३ पैकी १४१ व्या स्थानी आहे. हा अहवाल इंस्टीटूट फॉर इकोनॉमिक्स एंड पीस ह्या अंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत प्रकाशित केला जातो. ह्या अहवालामध्ये प्रथम स्थानी आहे आइसलैंड तर द्वितीय स्थानी आहे डेन्मार्क. ह्या अहवालामध्ये १६३ देशांचा समावेश होता आणि त्यांच्या देशाअंतर्गत शांततेनुसार क्रम दिला आहे.
३. (क) जिनेवा, १०५ वी अंतरराष्ट्रीय कामगार परिषद जिनेवामध्ये पार पडली. ही परिषद ३० मे रोजी सुरु झाली आणि  जूनला समारोप झाला. भारतातर्फे ह्या परिषदेमध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रय गेले होते.
४. (ब) दक्षिण कोरिया, २०१६ ची सहयोग-हएोबलोद (सहकार्य) संयुक्त सैनिकी अभ्यास शिबीर भारत-दक्षिण कोरिया दरम्यान ९ जून ते ११ जून दरम्यान पार पडले. हे शिबीर बंगालच्या उपसागरामध्ये चेन्नई येथे पार पडले. हे शिबीर दोन वर्षांमधुन एकदा पार पडते आणि हे ह्या शिबिराचे ५ वे वर्ष होते.
५. (क) एन रामचंद्रन, भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष एन रामचंद्रन यांना अंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने प्रतिष्ठित ऑलम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी ऑलम्पिक चळवळीसाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे.
६. (क) अमेरिका, जगामध्ये सर्वाधिक तेल वापरणारा अमेरिका असून त्याखालोखाल चीन, भारत, जापान आहेत. भारत दररोज ४.१ दशलक्ष बर्रेल्स वापरतो तर अमेरिका १९.३९ दशलक्ष बर्रेल्स, चीन ११.९६ बर्रेल्स तेल दररोज वापरतात. हा अहवाल दरवर्षी ब्रिटिश पेट्रोलियम कंपनीतर्फे प्रकाशित केला जातो.

No comments:

Post a Comment