Saturday 11 June 2016

चालू घडामोडी : ९ जून

१. जागतिक समुद्र दिन (ओशियन डे) हा दरवर्षी ८ जूनला पाळला जातो, यंदाची समुद्र दिनाची थीम काय होती?
अ - ऑउर ओशन, ऑउर रिस्पॉन्सिबिलिटी
ब - युथ: दी नेक्स्ट वेव ऑफ चेंज
क - हेल्थी ओशन, हेल्थी प्लॅनेट
ड - कैन वी प्रोटेक्ट ऑउर ओशन्स

२. रिज़र्व बँकेने नुकतेच दुमासीक मॉनेटरी स्टेटमेंट २०१६-१७ जाहिर केले, सध्याचा रेपो रेट काय आहे?
अ - ६.०%
ब - ६.५%
क - ७.०%
ड - ७.५%

३. तृतीय पंतियांना पेंशन आणि अन्नलाभ देण्याचा निर्णय घेतला असून असे करणारे भारतातील ते प्रथम राज्य आहे?
अ - राजस्थान
ब - पंजाब
क - ओडिशा
ड - कर्नाटक

४. खालीलपैकी कोणत्या शहर स्वता:चा शहर प्राणी (सिटी एनिमल) असणारे भारतातील पहिले शहर आहे?
अ - शिलॉन्ग
ब - गुवाहाटी
क - चंडीगढ़
ड - मुंबई

५. 'अखिल भारतीय महिला पत्रकार कार्यशाळा' कोणत्या शहरामध्ये पार पडली?
अ - जयपुर
ब - कानपूर
क - नवी दिल्ली
ड - भोपाळ

६. ओडिशामध्ये सिंचनला मदत मिळावी यासाठी भारताने नुकतेच आशियाई विकास बँक (एशियन डेवलपमेंट बँक) सोबत किती रक्कमेच्या लोन-करारावर स्वाक्षरी केली आहे?
अ - १०० दशलक्ष डॉलर्स
ब - १२० दशलक्ष डॉलर्स
क - १५० दशलक्ष डॉलर्स
ड - २१० दशलक्ष डॉलर्स

उत्तरे -
१. (क) हेल्थी ओशन्स, हेल्थी प्लॅनेट, जागतिक समुद्र दिन हा दरवर्षी ८ जूनला साजरा केला जातो. यंदा लोकांमध्ये समुद्र संवर्धन आणि त्याला प्रदूषित न करण्यासाठी हेल्थी ओशन्स, हेल्थी प्लॅनेट ही थीम ठेवण्यात आली होती.
२. (बी) ६.५%, रिज़र्व बँकेने ६.५% केला असून रिवर्स रेपो रेटमध्ये काहीही बदल न करता ६% ठेवला आहे तर शेडुल्ड बॅकांचा कॅश रिज़र्व रेशो न बदलता ४.०% ठेवला आहे .
३. (क) ओडिशा, तृतीय पंतियांना पेंशन त्याचप्रमाणे धान्यलाभ देणारे ओडिशा हे भारतातील प्रथम राज्य असून त्यांना दारिद्र्यरेषेखालील रेशनिंग कार्ड दिले जाणार आहे त्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेणे त्यांना सोयीस्कर जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना स्वत: चा व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय कर्जही मिळणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांना दरमहीना ५ किलो धान्य मिळणार आहे.
४. (ब) गुवाहाटी, आसामची राजधानी असलेले गुवाहाटी भारतातील पहिले शहर आहे ज्याचा स्वत: चा शहरी प्राणी आहे. गंगा नदीतील डॉल्फिन हा सिटी एनिमल आहे.
५. (क) नवी दिल्ली, महिला आणि बाल विकास मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि प्रेस इनफार्मेशन ब्यूरो ह्यांच्या सहयोगाने आयोजित पहिली अखिल भारतीय महिला पत्रकार कार्यशाळा नवी दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये पार पडली. ह्या कार्यशाळेमध्ये ३० भारतीय संघराज्यातून जवळपास २५० महिला पत्रकार आल्या होत्या.
६. (ब) १२० दशलक्ष डॉलर्स, भारत सरकार आणि आशियाई विकास बँकमध्ये १२० दशलक्ष डॉलर्सचा कर्जकरार झाला असून ह्या कर्जाचा वापर ओडीशामधील सिंचन आणि वॉटर मैनेजमेंट इंफ्रास्ट्रक्टर बनविण्यासाठी होणार आहे. ह्या प्रकल्पाअंतर्गत बैतरणी, ब्राह्मणी, बुधबलंगा, सुबर्णरेखा, आणि महानदीचे खोरे समाविष्ठ आहेत.

No comments:

Post a Comment