Thursday 9 June 2016

चालू घडामोडी : ४ जून

१. २०१८ मध्ये दक्षिण कोरियाच्या पयोंगचांग मध्ये भरवण्यात येणार्या पैरालिम्पिक विंटर गेम्ससाठी मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ - मुकमुक
ब - बंदबी
क - ल्यो एंड मर्ली
ड - टॉम

२. आर्थिक क्षेत्रामध्ये संशोधन आणि भरती प्रक्रियेसाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे?
अ - एन के मित्तल समिती
ब - आर एस लोढ़ा समिती
क - एम एन मिश्रा
ड - पी के सिंहा समिती

३. दक्षिण कोरियात भरविण्यात येणार्या २०१८ विंटर ओलंपिक्स साठी मैस्कॉट म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
अ - बेली मिश्का
ब - सूहोरंग
क - विल्ली
ड - विनिकस

४. आशिया खंडातील पहिला 'जिपस वल्चर रिइंट्रोडक्शन प्रोग्राम' कोणत्या भारतीय राज्यामध्ये सुरु करण्यात आला?
अ - गोवा
ब - महाराष्ट्र
क - हरियाणा
ड - गुजरात

५. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था म्हणजेच नाडाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नेमणुक करण्यात आली आहे?
अ - सुधीर मित्तल
ब - नवीन अग्रवाल
क - निहाल सिंघवी
ड - दीपक नारायण

६. सियट क्रिकेट रेटिंग तर्फे दिला जाणारा २०१६ चा जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
अ - कपिल देव
ब - दिलीप वेंगसरकर
क - सुनील गावसकर
ड - अजित वाडकर

उत्तरे:
१. (अ) बंदबी, बंदबी  हे आशियाई काळे अस्वल असून त्याला दक्षिण कोरियामध्ये होणार्या २०१८ च्या परालंपिक विंटर गेम्सचे मैस्कॉट घोषित करण्यात आले आहे. काळे अस्वल हे गंगवोंन प्रांताचे प्रतिक आहे.
२. (ब) पी के सिंहा समिती, केंद्र सरकारने आर्थिक क्षेत्रामध्ये संशोधन आणि भरती प्रक्रियेसाठी समिती स्थापन केली असून सदर समिती कॅबिनेटचे सचिव पी के सिंहा ह्यांचा अध्यक्षतेखाली काम करेल.
३. (ब ) सुहोरंग, सुहोरंग सफेद वाघाचे असून दक्षिण कोरियामध्ये होणार्या २०१६ ऑलिम्पिक विंटर गेम्ससाठी मैस्कॉट म्हणुन घोषित करण्यात आले आहे. पौराणिक दृष्ठ्या पाहिले तर कोरियन द्विपकल्पाचा आकार हा वाघाच्या आकराशी मिळता जुळता आहे. मैस्कॉटचा सफेद रंग विंटर गेम्समधील बर्फासोबत साम्य खाउन जातो.
४. (क) हरियाणा, जिप्स वल्चर रिइंट्रोडक्शन प्रोग्राम हरियाणाच्या जटायु संवर्धन आणि पैदास केंद्र, पिंजौरमध्ये सुरु करण्यात आला असून आशिया खंडातील हा पहिला प्रयोग आहे, ह्याचे उद्धघाटन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खटटर ह्यांनी केले.
५. (ब) नवीन अग्रवाल, १९८६ च्या बैचचे आईपीएस अधिकारी नवीन अग्रवाल यांची नॅशनल एंटी-डोपिंग एजेंसीच्या कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाडा ही राष्ट्रीय संस्था असून  डोपिंग विरोधी कारवाई, त्याचप्रमाणे जाहीरात आणि त्यांवर लक्ष ठेवण्याचे कार्य करते.
६. (ब) दिलीप वेंगसरकर, दिलीप बलवंत वेंगसरकर ह्यांना यंदाचा सियट क्रिकेट रेटिंग जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment