Thursday 16 June 2016

चालू घडामोडी : १४ जून

१. खालीलपैकी कोणता देश जंगलतोड बंदी करणारा जगातील पहिला देश आहे?
अ - पैराग्वे
ब - नॉर्वे
क - बोलीविया
ड - अर्जेंटीना

२. नुक्लेअर फ्यूल कॉम्प्लेक्सचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
अ - एम राधाकृष्णन
ब - जी कल्याणकृष्णन
क - एन साईबाबा
ड - अनुपमा परमेस्वरन

३. इंटरनॅशनल पैरालम्पिक कमिटीचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे?
अ - जिनेवा
ब - न्यू यॉर्क
क - पॅरिस
ड - बोन

४. लिटील मिस प्रिंसेस ऑफ एशिया २०१६ ची मानकरी कोण ठरली आहे?
अ - पेहर कुमारी
ब - मृदुला सिन्हा
क - महिमा सेन
ड - बैतूल अजमल

५. कोणत्या भारतीय लघु चित्रपटाला सेउल अंतरराष्ट्रीय महिला फिल्म फेस्टिवल २०१६ मध्ये प्रेक्षक निवड पुरस्कार मिळाला आहे?
अ - अहिल्या
ब - नामकरण
क - चाय
ड - लीचेस

उत्तरे :
१. (ब) नॉर्वे, जंगलतोड बंदी करणारा नॉर्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे. जंगलतोड बंदी ही नॉर्वेजियन सरकारची पॉलिसी असून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
२. (ब) जी कल्याणकृष्णन, नुक्लेअर फ्यूल कॉम्प्लेक्स चे नवीन मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून जी कल्याणकृष्णन यांची नेमणुक करण्यात आली आहे. एन साईबाबा ह्या आधीचे मुख्यकार्यकारी अधिकारी होते. नुक्लेअर फ्यूल कॉम्प्लेक्सचे मुख्यालय हैद्राबादला असून ऊर्जा निर्मितीसाठी लगनरया आण्विक इंधनाचा पुरवठा ही संस्था करते.
३. (ड) बोन, इंटरनॅशनल पैरालम्पिक कमिटीचे मुख्यालय बोनला असून तिने नुकतेच पैरालम्पिक कमिटी ऑफ इंडियाला पुन्हा मान्यता दिली असून सध्या राओ इंदरजीत सिंह हे अध्यक्ष आहेत. आयपीसी अंतरराष्ट्रीय पातळीवर पैरालम्पिक ९ खेळ भरविते. आयपीसीचे मुख्यालय बोन मध्ये असून पैरालम्पिक गेम्स ऑलिम्पिक गेम्सला समांतर भरविले जातात.
४. (ड) बैतूल अजमल, केरळच्या बैतूल अजमलला लिटिल मिस प्रिंसेस ऑफ एशिया २०१६ किताब मिळाला असून ही स्पर्धा जॉर्जिया येथे पार पडली. हयसोबतच बैतूलला 'यंग टॅलेंट', 'यंग मिस यूनिवर्स ग्रँड प्रिक्स' ने सन्मानित करण्यात आले आहे. ही स्पर्धा जॉर्जिया मध्ये ५ जून २०१६ रोजी पार पडली. ह्या स्पर्धेमध्ये २७ देशांमधील १०-१३ वयोगटातील २९ स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा किंगडम ऑफ यूनिवर्सल प्रोडक्शनने भरवली होती.
५. (ड) लीचेस

No comments:

Post a Comment