Tuesday 7 June 2016

फ्रेंच ओपन २०१६

फ्रेंच ओपन २०१६ ची पुरुष एकेरी:

जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल असणारा नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या एंडी मरेचा पराभव केला आणि आणि कारकिर्दितील पहिली फ्रेंच ओपन जिंकून आपल्या कारकिर्दीमधील पहिले करियर ग्रँड स्लैम पूर्ण केले. त्याने अंडी मरेचा ३-६, ६-१, ६-२, ६-४ असा पराभव केला.
फ्रेंच ओपन २०१६ ची महिला एकेरी:

गतवर्षीची विजेती सेरेना विलियम्स हीचा पराभव करून गार्बिन मुगुरुजा हिने फ्रेंच ओपन जिंकली आहे त्याचबरोबर तिने आपल्या कारकिर्दीमधील हे पहिले ग्रैंड स्लैम जिंकले आहे. तिने सेरेनाचा ७-५, ६-४ असा पराभव केला.
फ्रेंच ओपन २०१६ ची पुरुष दुहेरी:

स्पेनच्या फेलिशनो लोपेज़ आणि मार्क लोपेज़ ह्यांनी अमेरिकेच्या बॉब ब्रायन आणि माइक ब्रायन ह्यांचा ६-४, ६-७, ६-३ असा पराभव करून फ्रेंच ओपन २०१६ पुरुष दुहेरी चषक आपल्या घिश्यात टाकले.
फ्रेंच ओपन २०१६ ची महिला दुहेरी:

फ्रांसच्या कैरोलिन ग्रासिया आणि क्रिस्टीना मलदेनोविक ह्यांनी रशियाच्या एकटेरिना मकारोवा आणि एलेना वेस्नीना ह्यांचा ६-३, २-६, ६-४ असा पराभव करून महिला दुहेरीवर आपले नाव कोरले.
फ्रेंच ओपन २०१६ मिक्स दुहेरी:

भारताचा लीएंडर पेस आणि त्याची स्वीस जोड़ीदार मार्टिना हिंगिस ह्यांनी चुरशीच्या सामन्यामध्ये सानिया मिर्झा आणि इवान डोडिग ह्यांचा ४-६, ६-४, १०-८ असा पराभव केला आणि करियर स्लैम देखील मिळवले.

No comments:

Post a Comment