Sunday 19 June 2016

चालू घडामोडी : महत्त्वाचे मुद्दे

१. सुप्रिया साहू यांची दूरदर्शनच्या महासंचालक पदी नेमणुक करण्यात आली असून ह्याआधीच्या अपर्णा वैश महासंचालक होत्या.
२. ज्येष्ठ लीगल सर्विसेस ऑफिसर सुरेशचंद्र यांची केंद्रीय कायदे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
३. भारती इंटरप्राइजेजचे चेयरमैन आणि संस्थापक सुनील भारती मित्तल यांची पॅरिसमध्ये स्थित अंतरराष्ट्रीय कॉमर्स चैंबरचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. इंटरनॅशनल कॉमर्स चैंबरची स्थापना १९१९ मध्ये पॅरिस मध्ये झाली आहे.
४. २१ जून रोजी होणार्या अंतरराष्ट्रीय योग दीनानिम्मित भारत सरकारने एक योग गीत प्रकाशित केले आहे. हे गाणे हिंदीमध्ये असून त्याचा कालावधी ३ मिनिटे आणि १५ सेकंद आहे. इंटरनॅशनल योग दिन हा २१ जून रोजी साजरा केला जातो. येणारा योग दिन हा दूसरा जागतिक योग दिन असेल.
५. पियूष गोयल यांनी ग्राहक कनेक्टिविटी वाढविण्यासाठी गोव्यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये विद्युत प्रवाह आणि ऊर्जा अर्बन ज्योती अभियान ही दोन मोबाइल ऍप सुरु केली.
६. ज्येष्ठ ओडिया अभिनेत्री मणिमाला देवी यांचे नुकतेच निधन झाले.
७. रिओ आयोजन समितीने दक्षिण अमेरिकेत होणार्या ऑलिम्पिक आणि पैरालम्पिक गेम्ससाठी अधिकृत घोषवाक्य 'अ न्यू वर्ल्ड' प्रसिद्ध करण्यात आले आहे.
८. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी भारतातील पहिली वेळापत्रकावर आधारित मालवाहतूक रेल्वे 'कार्गो एक्सप्रेस' ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन नवी दिल्लीहून बँगलोर जाणार आहे.
९. कनैडियन कवी, कादंबरीकार आणि पर्यावरण कार्यकर्ते मार्गरेट एटवुड यांना २०१६ चा पेन पिंटर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१०. पुण्याचे मधुमेह स्पेशालिस्ट सशांक शाह यांना विवियन फोंसेका स्कॉलर अवार्ड २०१६ ने सन्मानित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment