१ - बीएल जोशी दुसर्यांदा उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त - बनवारीलाल जोशी यांनी ६ मार्च २०१४ रोजी दुसर्यांदा उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला
त्याचप्रमाणे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांना ४ मार्च २०१४ रोजी केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले गेले आहे
राज्यपाल नियुक्ती - भारतीय राज्यघटनेतील कलम १५५ नुसार प्रत्येक घटक राज्यांसाठी राज्यपालांची नियुक्ती केली जाते. राष्ट्रपती राज्यपाल नियुक्त करतात. राज्यपाल हा राज्याच्या कार्यप्रणालीचा प्रमुख असतो. राज्यपाल हा जनतेचे प्रतिनिधित्व करत नाही, तर तो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून काम करतो
राज्यपालांचा कार्यकाल - ५ वर्षे, ज्या दिवशी पदग्रहण केले त्या दिवसापासून सुरुवात. कलम १५६ नुसार, राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंत राज्यपाल अधिकारपदावर राहू शकतो
२ - आर के तिवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डचे अध्यक्ष - आर के तिवारी यांनी ३ मार्च २०१४ रोजी सेंट्रल डायरेक्ट टॅक्स चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झालेल्या सुधा शर्मा यांचा पदभार स्वीकारला आहे
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड - केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड आयकर विभागाचा प्रशासकीय प्राधिकरण आहे
३ - दिनेश कुमार सराफ तेल आणि नैसर्गिक वायु निगम चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त - २८ फेब्रुवारी २०१४ रोजी दिनेश सराफ यांना तेल आणि नैसर्गिक वायु निगमचे अध्यक्ष त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय संचालक म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे त्यांनी २८ फेब्रुवारीला सेवानिवृत्त झालेल्या सुधीर वासुदेव यांच्या स्थानी नेमणूक झाली आहे सराफ हे ह्याआधी ओएनजीसी विदेश लिमिटेड चे प्रमुख होते
४ - इब्राहिम महलाब इजिप्तचे नवीन पंतप्रधान - २५ फेब्रुवारी २०१४ रोजी इब्राहिम महलाब यांनी इजिप्तचे नवीन प्रधानमंत्री म्हणुन शपथ घेतली. इब्राहिम महलाब यांनी हजेम अल-बेबलवी यांचे स्थान घेतले आहे
No comments:
Post a Comment