भारतीय जनगणना २०११:
- भारताची १५ वी जनगणना, पहिली जनगणना १८७१ लार्ड मेयो
- जनगणना आयुक्त - सी. चंद्रमौली
- बोधवाक्य - आपली जनगणना, आपले भविष्य
- लोकसंख्या वाढीचा दर १७.६४ %
- विस्तार - ३५ राज्ये व केंद्रशासित प्रदेश, ६४० जिल्हे, ५,७५७ तालुके, ७,७४२ शहरे व ६ लाखाहून अधिक खेडी
- २७ लाख अधिकाऱ्यांनी ७,७४२ शहरे व ६,४०,८६७ गावांत जाउन जनगणना केली
- खर्च २,२०० कोटी
- स्त्रियांच्या संख्येत वाढ, स्त्री साक्षरतेतील वाढ (९.१३%)
- ० ते ६ वयोगटातील मुलींचे दरहजारी मुलांमागे घटते प्रमाण
- लोकसंख्या दर कमी करण्यात आलेले यश
- जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १७.५०%
- देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा - ठाणे
- दर हजारी पुरुषांमागे महिलांचे प्रमाण वाढले
१ - दृष्टी क्षेपातिल भारत:
- एकुण लोकसंख्या - १२१,०१,९३,४२२
- पुरुषांची संख्या - ६२,६७,२४,२४८
- महिलांची संख्या - ५८,६४,६९,१७४
- सर्वात जास्त लोकसंख्या असणारी राज्ये: उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश
२ - साक्षरता:
- संपूर्ण भारताची साक्षरता ७४.०४%.
- पुरुषांची साक्षरता ८२.१४%
- महिलांची साक्षरता ६५.४६%
- सर्वात जास्त साक्षरता असणारी राज्ये: केरळ, मिझोरम, त्रिपुरा, गोवा, हिमाचल प्रदेश
- सर्वात कमी साक्षरता असणारी राज्ये: बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड
३ - घनता:
- संपूर्ण भारताची घनता ३८२ लोक प्रति किमी वर्ग
- सर्वात जास्त घनता असणारी राज्ये: बिहार - ११०२, पश्चिम बंगाल - १०२९, केरळ - ६८९, उत्तर प्रदेश - ८२८
- सर्वात कमी घनता असणारी राज्ये: अरुणाचल प्रदेश - १७, मिझोरम - ५१, सिक्कीम - ८६, नागालैंड - ११९
- सर्वात जास्त घनता असणारे केंद्र शाशित प्रदेश: दिल्ली - ११२९७, चंदिगद - ९२५२, पद्दुचेरी - २५९८
- सर्वात कमी घनता असणारे केंद्र शाशित प्रदेश: अंदमान निकोबार बेटे - ४६, दादरा व नगरहवेली - ६९८, लक्षद्वीप - २०१३
४ - लिंग गुणोत्तर:
- संपूर्ण भारताचे लिंग गुणोत्तर ९४० महिला प्रति १००० पुरुष
- सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारी राज्ये: केरळ - १०८४, तमिळनाडू - ९९५, आंध्रप्रदेश - ९९२, छत्तीसगड - ९९१
- सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारी राज्ये: हरियाणा - ८७७, जम्मू आणि कश्मीर - ८८३, सिक्कीम - ८८९, पंजाब - ८९३
- सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा केंद्र शाशित प्रदेश: पदुच्चेरी - १०३८
- सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा केंद्र शाशित प्रदेश: दमण व दीव - ६१८
५ - ० ते ६ वयोगटातील एकुण लोकसंख्या:
- ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या २१,३४,७८,११९ (१७.६४%)
- ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ९१४ मुली प्रति १००० मुले
No comments:
Post a Comment