Showing posts with label Economics. Show all posts
Showing posts with label Economics. Show all posts

Saturday, 23 July 2016

जगातील शेअर बाजार अणि त्यांचे मुख्यालय

जगातील काही महत्त्वाच्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या स्टॉक एक्सचेंज यादी खालीलप्रमाणे आहे. ह्यापैकी काही स्टॉक एक्सचेंजचेमार्केट कैपिटल तब्बल १ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सहून जास्त आहे. अशा स्टॉक एक्सचेंजेसला "१ ट्रिलियन डॉलर्स क्लब" संबोधले जाते. २०१५ मध्ये ह्या १६ स्टॉक एक्सचेंजचे ग्लोबल मार्केट कॅपिटल ८७% होते.
१. न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय न्यू यॉर्क सिटी, अमेरिका
२. नैस्डेक ओमक्स - मुख्यालय न्यू यॉर्क सिटी, अमेरिका
३. जापान एक्सचेंज ग्रुप, टोकोयो - मुख्यालय टोकयो, जापान
४. लंडन स्टॉक एक्सचेंज ग्रुप - मुख्यालय लंडन, यूनाइटेड किंगडम आणि इटली
५. शांघाई स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय शांघाई, चीन
६. हॉन्ग कोंग स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय हॉन्ग काँग, हॉन्ग कॉन्ग
७. यूरोनेक्स्ट - मुख्यालय एमस्टर्डम, ब्रुसेल्स, लिस्बन, पॅरिस, यूरोपियन यूनियन
८. टीएमक्स ग्रुप - मुख्यालय टोरंटो, कनाडा
९. शेंजहेन स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय शेंजहेन, चीन
१०. ड्यूट्सचे बोरसे - मुख्यालय, फ़्रैंकफ़र्ट, जर्मनी
११. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय मुंबई, भारत
१२. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ़ इंडिया - मुख्यालय मुंबई, भारत
१३. सिक्स स्वीस एक्सचेंज - मुख्यालय जुरीच, स्विट्ज़रलैंड
१४. ऑस्ट्रिलियान सिक्योरिटीज एक्सचेंज - मुख्यालय सिडनी, ऑस्ट्रेलिया
१५. कोरिया एक्सचेंज - मुख्यालय सीओल, दक्षिण कोरिया
१६. ओमक्स नॉर्डिक एक्सचेंज - मुख्यालय स्टॉकहोल्म, अर्मेनिआ आणि उत्तर यूरोप
१७. जेएसई लिमिटेड - मुख्यालय जोहान्सबर्ग, दक्षिण अफ्रीका
१८. बीएमई स्पेनिश एक्सचेंजेस - मुख्यालय मॅड्रिड, स्पेन
१९. ताइवान स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय ताइपेई, ताइवान
२०. बीएम एंड एफ बोवेस्पा - मुख्यालय साओ पॉलो, ब्राझिल
२१. मोंटेरेल एक्सचेंज - मुख्यालय मोंटेरल, कनाडा
२२. रॉयल सेक्युरिटीज एक्सचेंज ऑफ़ भूटान - मुख्यालय थिम्पू, भूटान
२३. कोलोंबो स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय कोलोंबो, श्रीलंका
२४. मालदीव स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय माले, मालदीव
२५. अफ़ग़ानिस्तान स्टॉक एक्सचेंज - मुख्यालय काबुल, अफ़ग़ानिस्तान

Tuesday, 21 June 2016

भारतीय रिझर्व्ह बँक


भारतीय रिझर्व्ह बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती आर्थिक संस्था आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँक देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व्ह बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण (मॉनेटरी पॉलिसी) आणि पतधोरण (क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.
संपूर्ण भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची २२ क्षेत्रीय कार्यालये आहेत  कार्यालये त्यात्या राज्यांच्या राजधानी ठिकाणी आहेत.
प्रमुख उद्देश:
* भारतीय चलनी नोटांची छपाई नियमित करणे.
* वित्तीय प्रणालीचे विनियमन आणि पर्यवेक्षण करणे.
* भारताची गंगजळी राखणे
* भारताची आर्थिक स्थिती राखणे.
* भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.
इतिहास: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना हिल्टन यंग समितीच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँक कायदा १९३४ अन्वये १ एप्रिल १९३५ ला करण्यात आली. बँकेचे मुख्यालय पहिल्यापासूनच मुंबई येथे असून येथूनच बँकेचे प्रमुख कार्य चलते. या बँकेने ब्रम्हदेशाची मध्यवर्ती बँक म्हणून एप्रिल १९४७ तर पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून जून १९४८ पर्यंत काम पाहिले. सुरुवातीस बँकेची मालकी खाजगी हातांमध्ये होती. परंतु १९४९ पासून बँक पूर्णपणे केंद्र सरकारच्या मालकीची झाली.
गव्हर्नर: भारतीय नोटा चलन म्हणून योग्य असल्याचे प्रमाण आणि सरकारतर्फे खात्री म्हणून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नोटांवर एक वचन नामा आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी करतात. सर ऑस्बर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी कार्यभार स्वीकारला ते ३० जून १९३७ पर्यंत गव्हर्नर पदावर होते आणि त्या काळातील एकाही नोटेवर त्यांची स्वाक्षरी नव्हती.
त्यानंतर सर जेम्स ब्रेड टेलर १ जुलै १९३७ ते १७ फेब्रुवारी १९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते, ते ११ ऑगस्ट १९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणूनही काम पाहिले.
सध्या रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असून त्यांचा पदभार सप्टेंबर २०१६ मध्ये पूर्ण होणार आहे.