Sunday, 31 January 2016

इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू

पाच वर्षांतून एकदा देशाचे सर्वोच्च सेनाधिपती म्हणून राष्ट्रपतींकडून भारताच्या नौदल ताफ्याच्या संचालनाचे अवलोकन केले जाते. त्यास प्रेसिडेंशियल फ्लीट रिव्ह्यू म्हणतात. आपले नौदल सामर्थ्य जगाला दाखवून देण्यासाठी भारताने २००१ मध्ये त्यास अंतरराष्ट्रीय रूप दिले, जानेवारी २००१ मध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये २९ देशांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर आता ०४ - ०८ फेब्रुवारी  दरम्यान विशापट्टनम येथे भारताचा दूसरा इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू होत आहे. ह्या आधीचा फ्लीट रिव्ह्यू हा  जानेवारी २०११ मध्ये मुंबई येथे पार पडला होता.
जगभरातील ५२ देशांच्या नौदलांच्या वरिष्ठ दर्यावर्दिंनी भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे कूच केली आहे. यामध्ये भारताच्या युद्धनौकांसह अमेरिका, चीन, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया आदी बलाढ्य नौदलांच्या एकूण ९० युद्धनौका आणि २० हजार नौसैनिक बंगालच्या उपसागरातील आरमार नियोजनाच्या कसोटीत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

डिजीटल स्वरुप: यंदा इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूसाठी जगभरातील सर्व नोंदणी वेबसाइटच्या माध्यमातून करण्यात आल्या असून, या वेबसाइटवर व्हिडिओ, फोटो देण्यात येणार आहेत.

Saturday, 30 January 2016

चालू घडामोडी - २६ जानेवारी

१. पोर्तुगालचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - मार्सेलो रेबेलो डिसूज़ा, पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक, पत्रकार, राजकारणतज्ञ, पंडित असलेले मार्सेलो रेबेलो डिसूज़ा यांनी बाजी मारली आहे. याआधी ते खासदार त्याचप्रमाणे मंत्री होते.

२. यंदाचा राष्ट्रिय यश चोप्रा पुरस्कार कोणाला जाहिर झाला आहे?
उत्तर - रेखा, ज्येष्ठ बॉलीवुड अभिनेत्री रेखा यांना तिसऱ्या राष्ट्रिय यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना फ़िल्मी क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल देण्यात आला आहे. हा पुरस्कार टी इस आर फाउंडेशन तर्फे यश चोप्रा यांच्या स्मरणार्थ २०१२ पासून दिला जातो. सुवर्ण पदक आणि रोख १० लाख रुपये असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.

३. शंकर घोष यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर - तबलावादक, प्रसिद्द तबला उस्ताद पंडित शंकर घोष यांचे कोलकाता येथे निधन झाले ते ८० वर्षाचे होते. ते फरुखाबाद घराण्याचे होते आणि देशातील नामांकित तबलावादकांपैकी एक होते.

४. राष्ट्रिय मतदार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर - २५ जानेवारी, सहावा राष्ट्रिय मतदार दिन संपूर्ण भारतामध्ये भारतीय निवडणूक आयोगातर्फे २५ जानेवारीला साजरा करण्यात आला. २५ जानेवारी १८५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

५. जिका विषाणूंच्या प्रसारासाठी कोण कारणीभूत आहेत?
उत्तर - मच्छर, नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने जिका विषाणुबद्दल सर्व सदस्य राष्ट्रांना धोक्याचा इशारा दिला आहे. मच्छर हे जिका विषाणूचे प्रसारक असून ह्याचा परिणाम म्हणजे मानवी जन्मदोष. हा विषाणू कॅनडा व चिली वगळता संपूर्ण अमेरिकेमध्ये पसरला असल्याची शक्यता आहे. हा विषाणू १९४७ मध्ये प्रथम सापडला होता.

६. कोणत्या देशाच्या सैनिकांनी भारतीय प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये सहभागी झाले होते?
उत्तर - फ़्रांस, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासामध्ये प्रथमच फ्रान्सच्या ७६ सैनिकांनी सहभाग घेतला होता. 

चालू घडामोडी - २४ जानेवारी

१. सर्वात जास्त एकेरी ग्रैंड स्लैम सामने जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
उत्तर - मार्टिना नवरातिलोवा, नुकतेच रॉजर फेडररने ३०० एकेरी ग्रैंड स्लैम सामने जिंकत सर्वात जास्त एकेरी ग्रैंड स्लैम जिंकण्याचा विक्रम केला आहे, असे करणारा तो पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे . त्याचप्रमाणे सर्वात जास्त एकेरी ग्रैंड स्लैम सामने जिंकण्याचा विक्रम मार्टिना नवरतिलोवाच्या नावावर आहे (पुरुष आणि महिला).

२. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना (२०१६) हा अहवाल कोणत्या अंतरराष्ट्रिय संस्थेने प्रकाशित केला आहे?
उत्तर - संयुक्त राष्ट्रे, संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आर्थिक स्थिती आणि संभावना २०१६ अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात जलद वाढणारी अर्थव्यवस्था आहे. अहवालानुसार भारताचा २०१५ चा विकासदर 7.२% होता तर २०१६ चा संभावित विकासदर ७.३% असेल तर २०१७ मधील विकासदर जवळपास ७.५% असेल.

३. पहिला अंध आशियाई टी२० चषक कोणत्या देशाने जिंकले आहे?
उत्तर - भारत, जवाहरलाल अंतरराष्ट्रिय स्टेडियम, कोच्ची येथे भारताने पहिल्या अंध आशियाई टी२० चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे.

४. २०१६ ची मलेशियन ग्रैंड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकली?
उत्तर - पी वी सिंधु, भारतीय बॅडमिंटनपटू पी वी सिंधु हीने २०१६ ची मलेशियन ग्रैंड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. पेनांग येथे झालेल्या अंतिम समन्यामध्ये तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा पराभव केला. ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली असून २०१३ मध्ये मलेशियन ग्रैंड प्रिक्स गोल्ड बॅडमिंटन जिंकली होती. तिचे हे पाचवे ग्रैंड प्रिक्स जेतेपद असून २०१६ चे पाहिले जेतेपद आहे.

५. फ्री हाय स्पीड वाय-फाय इंटरनेट सुविधा देणारे कोणते रेल्वे स्टेशन पाहिले भारतीय रेल्वे स्टेशन आहे?
उत्तर - मुंबई सेंट्रल स्टेशन, गूगल भारत (गूगल इंडिया) आणि भारतीय रेल्वेच्या रैलटेलने रेल्वे प्रवाशांसाठी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर फ्री रेल वायर पब्लिक वाय-फाय सुविधा सुरु केली आहे.

६. फेनी हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध पेय आहे?
उत्त्तर - गोवा, २०१० मध्ये फेनी ह्या पेयाला भौगोलिक मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे हे राज्याबाहेर विकण्याची तयारी गोवा सरकारने दर्शविली आहे.

Sunday, 24 January 2016

१८५७ च्या उठावाची कारणे

* सामाजिक कारणे: केवळ स्वत:ची संस्कृती श्रेष्ठ मानताना इंग्रजांनी संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले त्याचप्रमाणे सतिबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा-पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्यायकारक कायदे ब्रिटिशांनी भारतात राबविले. परंपरागत भारतीय समाजाला हे आपल्या संस्कृतीवर संकट वाटले.

* धार्मिक कारणे: १८१३ च्या कायद्याने इंगलंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. पर्यायाने इंग्रजी आक्रमणाने प्रथम सत्ता गेली, नंतर व्यापार-उदीम बुडाला आणि आता  धर्मावर संकट आल्याची भावना वाढीस आली. १८०६ मध्ये लष्कराच्या मद्रास छावनीतील शिपयांना गंध लावण्यास व दाढ़ी वाढवण्यास बंदी घालण्यात आली. १८४२ साली ब्रम्हदेशच्या युद्धात हिंदू शिपयांना सक्तीने पाठविण्यास आले. परदेशगमन, समुद्र पर्यटन या गोष्टी त्याज्य मानणाऱ्या हिंदी शिपयांत यामुळे असंतोष वाढू लागला.

* आर्थिक कारणे:
१. हस्तव्यवसायाची अधोगती: भारतातील कच्चा मालावार अधोरित इंग्लंडमधील यंत्रावरील तयार माल भारतात उपलब्ध झाल्याने येथील पारंपारिक हस्तव्यवसायचा क्षय होत गेला आणि करागीर पुरते बुडाले.
२. शेतकरी-जमीनदार या वर्गात रयतवारी, महालवारी, कायमधारा आदि सदोष महसुलपद्धतीमुळे असंतोष पसरला.

* लष्करी कारणे: हिंदी शिपयांना ब्रिटिश सैन्याच्या तुलनेत मिळणारी अन्यायी वागणूक, हिंदी शिपयांवरील लष्करातील शिस्तीसंबंधीचे जाचक नियम इत्यादी कारणांमुळे सैनिकांत असंतोष होता.

* राजकीय कारणे:
१. वेलेस्लीच्या तैनाती फ़ौजेचे दुष्परिणाम: तैनाती फ़ौजेच्या पद्धतीमुळे इंग्रज फ़ौजेचा सर्व ख़र्च ती ज्याच्या पदरी असेल त्या राजाने करायचा व त्या फ़ौजेवर हुकूमत गाजवायची ती मात्र इंग्रजांनी या वेलेस्लीच्या मुत्सद्दी डावपेचामुळे तैनाती फ़ौजेच्या प्रभावाखालील राज्ये दुबळी बनली व त्यांच्यात असंतोष निर्माण झाला.
२. डलहौसीचे आक्रामक विस्तारवादी धोरण: प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अमंलाखाली आणण्याच्या हेतूने लॉर्ड डलहौसीच्या १८४८ ते १८५६ या काळात भारतातील अनेक संस्थाने 'दत्तक वारसा नामंजूर' तत्त्वानुसार तसेच प्रशासनात गौरकारभार कारणावरून खालसा केली. याशिवाय राजेराजवाड्यांच्या पदव्या आणि तनखे बंद करून टाकले.

* तात्कालीन कारण: सौनिकांनी बंदुकीची काडतूसे वापरताना त्यांची आवरणे दातांनी तोडावी लागत, या काडतुसांना गाईची व डुकरांची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करात पसरताच हिंदू-मुस्लिम सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या आणि ते बंड करून उठले. अशाप्रकारे वर्षानुवर्षे दाटलेल्या असंतोषाच्या उद्रेक १८५७ च्या उठावाने झाला.

Saturday, 23 January 2016

१८५७ चा उठाव - ब्रिटिश सत्तेचा इतिहास आणि पार्श्वभूमी

१८५७ चा उठाव हा १० मे १८५७ रोजी मेरठ मधील लष्करी छावनीतील बंडापासून सुरु झाला आणि लवकरच तो उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरला. हा लढा १८५७ चे स्वतंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वतंत्र्यलढा, शिपयांचे बंड अशा इतर नावांनीही ओळखला जातो. जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व तो तब्बल ९० वर्ष चालला आणि १९४७ ला भारत स्वातंत्र्य झाला.

भारतामधील ब्रिटिश सत्तेचे विस्ताराचा संक्षिप्त इतिहास: ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ मध्ये रॉबर्ट क्लाइवच्या नेतृत्त्वाखाली प्लासीची लढाई जिंकली. लढाईनंतर झालेल्या करारामध्ये ब्रिटिशांना बंगालमध्ये कर मुक्त व्यापर करण्याचा अधिकार मिळाला. १७६४ मध्ये बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजी फ़ौजेने नवाब, बादशहा आणि मीर कासिमाच्या संयुक्त फौंजाचा फज्जा उडविला. अशाप्रकारे प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला तर बक्सारच्या लढाईतील विजयाने हा पाया मजबूत केला गेला. ह्याचा प्रभाव असा झाला की कंपनीने संपूर्ण भारतामध्ये आपला प्रभाव निर्माण करण्यात सुरुवात केली.
१८३९ मध्ये महाराजा रणजीत सिंह यांच्या मृत्यु नंतर पंजाब कमजोर झाले आणि यातूनच १८४८ मध्ये दूसरे ब्रिटिश विरुद्ध शीख युद्ध झाले. १८४९ मध्ये कंपनीने पंजाब प्रांत ही आपल्या अधिपत्याखाली आणले. १८५३ मध्ये शेवटचे मराठा पेशवा बाजीराव यांचे दत्तक पुत्र नानासाहेब यांचा वार्षिक खर्च ही कंपनीने बंद केला. १८५४ मध्ये बरार तर १८५६ मध्ये अवध प्रांतही कंपनीने आपल्या ताब्यात घेतले.

उठावाची पार्श्वभूमी: यामध्ये १८५७ पूर्वी भारतात ब्रिटाशांविरुध्ध झालेल्या उठावांचा समावेश आहे,
* १७६३ ते १७८० या काळातील संन्याशांचे बंड
* १७६५ ते १७८६ या काळात चुआर येथे झालेले दोन उठाव (मिदनापुर, बांकुरा जिल्हा, पश्चिम बंगाल)
* महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी रामोश्यांना एकत्रित करून इंग्रजांविरुध्ध केलेला उठाव (यासाठी त्यांना १८३२ साली फाशी देण्यात आली)
* आंध्र प्रदेशातील पाळेगारांचा उठाव
* १८४४ मधील कोल्हापुर येथील उठाव
* उत्तर भारतातील जाटांचे त्याचप्रमाणे राजपूतांचे आणि बुंदेल्याचे उठाव
* विदर्भ आणि खानदेशातील आदिवासींचे उठाव
* छोटा नागपूर भागातील कोलामांचा उठाव
* बिहारमधील संथालांचा उठाव

Friday, 22 January 2016

चालू घडामोडी - १४ जानेवारी

१. कोणते भारतीय संघराज्य १००% सेंद्रिय शेती करणारे पाहिले राज्य बनले आहे?
उत्तर - सिक्किम, ७५००० हेक्टर शेतजमिनीवर सेंद्रिय शेती करुण सिक्किम हे भारतातील १००% सेंद्रिय शेती करणारे पाहिले राज्य ठरले आहे.

२. ऐलान रिकमण यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - हॉलीवुड अभिनेता, ऐलान रिकमण यांचे नुकतेच लंडनमध्ये निधन झाले ते ६९ वर्षांचे होते ते आपल्या खलनायकाच्या भूमिकेसाठी पसिद्ध आहेत. हैरी पॉटर, डाय हार्ड, रॉबिन हुड: प्रिंस ऑफ़ थीव्स, गॅलक्सी कुस्ट इ. या चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहेत.

३. २०१४-१५ चा  कृषी कर्मन पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - मध्य प्रदेश, दरवर्षी कृषी क्षेत्रामध्ये दिला जाणारा प्रतिशिष्ठ कृषी कर्मन पुरस्कार यंदाही मध्य प्रदेश राज्याने पटकाविला आहे (धान्याचे जास्तीत जस्ट उत्पादन घेतले म्हणून). हा पुरस्कार मध्य प्रदेश राज्याने सलग ४ थ्यांदा पटकाविला आहे. याआधी २०११, २०१२, २०१३, २०१४ या वर्षी हा पुरस्कार मध्य प्रदेश राज्यलाच मिळाला आहे.

४. भारतीय प्रजासत्ताक दिनी कोणत्या राज्य जगातील सर्वात मोठा तिरंगा फडकविण्यासाठी सज्ज झाले आहे?
उत्तर - झारखंड, २६ जानेवारी रोजी झारखंड जगातील सर्वात मोठा तिरंगा फडकविण्यासाठी  आहे. हा तिरंगा रांचीच्या पहाड़ी मंदिरावर फडकविण्यात येईल. हा तिरंगा तब्बल २९३ फूट उंच असेल म्हणजेच क़ुतुब मीनारहून ५३ फूट उंच.

५. क्रिएटिंग लीडरशिप या पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्त्तर - किरण बेदी, किरण बेदी यांनी क्रिएटिंग लीडरशिप हे पुस्तक लिहिले असून त्यात त्यांनी पोलिस सेवाकाळातील उदाहरणे दिली आहेत.

६. २०१६ चा जागतिक विकास अहवाल कोणी प्रकाशित केला आहे?
उत्तर - जागतिक बँक, जागतिक बँकेने २०१६ च जागतिक विकास अहवाल प्रकाशित केला असून त्यात सर्वांगीण विकासासाठी आपण इंफोर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलजीचा कसा वापर करू शकतो यावर चर्चा केली आहे.